आकर्षणाचा सिद्धांत काय असतो ?
आकर्षणाचा सिद्धांत काय असतो ?

आकर्षणाचा सिद्धांत काय असतो ?

Reading Time: 4 minutes

संपूर्ण विश्व काही नियमांवर चालत ,ह्यातील काही नियम आपल्याला माहित असतात आणि काही माहित नसतात. पण सृष्टीच्या उत्पत्ती पासून हे नियम अस्तित्वात आहेत आणि त्या प्रमाणेच सर्व काही निसर्गा मध्ये सुरु असतं . ह्यातील च एक नियम म्हणजे आकर्षणाचा नियम. काही वर्षांपूर्वी असाच एकदा मी माझ्या एका मित्राशी बोलत होते आणि आमचा विषय बोलता बोलता अजून एका मित्राचं लग्न जमत नाही ह्यावरती गेला आणि तो मित्र मला म्हणाला कि “अग मी त्याला LOA  अप्लाय कर म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत वापर सांगितलेलं पण तरीही त्याच लग्न जमत नाही आहे. “

आकर्षणाचा सिद्धांत आपल्याला जे हवं आहे ते मिळवून देतो ,हे लोकांना माहित असत पण मग नक्की चुकत कुठं ,आणि तो वापरताना काही सूचना पाळायच्या असतात का ? असे अनेक प्रश्न माझ्या मनात आले आणि मी वाचन सुरु केलं. त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं कि आकर्षणाचा नियम खरं तर नेहमीच म्हणजे अव्याहत च काम करत असतो .

आकर्षणाचा नियम हि काही कोणती वस्तू नाही आहे कि हवी तेव्हा वापरली आणि गरज नसेल तेव्हा कपाटात इ.ठेवून टाकली.

काय असतो बरं हा आकर्षणाचा नियम ?

आकर्षणाचा नियम हा विश्वातील एक शक्तिशाली नियम आहे. आकर्षणाचा नियम एका वाक्यात सांगायचा प्रयत्न करायचा झाला तर सम-समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. आपण  म्हणतो ना “लाईक अट्रॅकटस लाईक !”

आणि हा नियम नकळत तुम्ही अनुभवातही असता बर का ! जस कि एखादा दिवसाची सुरुवात च अशी इतकी वाईट होते आणि सगळ्या मनस्ताप घडणाऱ्या घटनांची मालिका त्या दिवशी आपल्या बाबतीत दिवस भर घडते आणि आपण दिवसभर हेच म्हणत राहतो कि “सकाळी सकाळी कुणाचं तोंड पाहिलं आणि दिवस असा गेला!”

खर तर असं कुणाला पाहून दिवस वाईट जात नसतो तर हे  आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुम्ही जो विचार आकर्षित केलेला असतो त्यामुळे घडलेलं असत. तुम्ही करत असलेले विचार आणि येणारे अनुभव ह्यांची जर तुम्ही सांगड घातलीत तर तुम्हाला नीट समजून येईल. एखादी वाईट घटना सकाळी घडली कि तुमच्या मनात एक च विचार सुरु होतो कि दिवस नीट जाईल ना ! हे नको व्हायला,ते नको व्हायला ! आता ह्या मध्ये तुमचा फोकस जे तुम्हाला नको आहे त्यावर आहे त्यामुळे आकर्षणाच्या नियमाप्रमाणे तुम्ही त्याच गोष्टी आकर्षित करता ज्या तुम्हाला नको होत्या.

 

 ह्या जगामध्ये प्रत्येक गोष्ट दोनदा घडते ह्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही माझी जुनी ब्लॉग पोस्ट वाचू शकता. https://timelesspositive.blogspot.com/  पहिल्यांदा कोणतीही गोष्ट मनात घडत असते आणि नंतर सत्यात घडत असते.आपला प्रत्येक विचाराला एक फ्रिक्वेन्सी असते.  आणि तुमच्या सबकॉन्शस माईंडला फक्त भावना समजतात ,त्याला चूक -बरोबर हे समजत नाही .(हे काम कॉन्शस माईंड च असतं आणि आपलं सबकॉन्शस माईंड हे निसर्गाशी किव्हा परमेश्वराशी जोडलेलं असत.)

आता तुम्ही असं समजा कि तुमच्या भावना ह्या जणू काही रेडिओ स्टेशन आहेत. म्हणजे जस तुम्हाला भजन ऐकायचं असेल तर तुम्ही पर्टिक्युलर तेच चॅनेल लावाल, तरच तुम्हाला भजन ऐकू येईल  आणि  तुम्हाला जर लव्ह सॉंग्स ऐकायची असतील तर तुम्हाला ती ज्या रेडिओ स्टेशन ला लागतात त्या चॅनल ला ट्यून करावं लागेल अगदी तसंच असत हे. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला हवी आहे किव्हा ज्या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्याल ती गोष्ट तुमच्यासाठी तुम्ही आकर्षित करता.

तुम्ही जर भूतकाळाचा विचार करत असलात ,किव्हा भविष्यकाळाचा विचार करत असलात तरी आता तुम्ही ज्या वर लक्ष्य केंद्रित करता आहात त्या कंपनांना आकर्षणाचा सिद्धांत प्रतिसाद  देणारच.

आणि इथे तुम्हाला सकारात्मक विचारसरणी चा फायदा होतो ,म्हणजे जे लोक सकारात्मक विचारसरणी स्वीकारत असतात  वर्तमानात जगत असतात .

बाकीचे एक तर भूतकाळात जगत असतात किव्हा भविष्यकाळात . म्हणजे असं कि बऱ्याच लोकांना हि सवय असते कि जे झालं त्या बद्दल च गिल्ट ते मनात सतत बाळगून असतात किव्हा जे झालं ते पुन्हा भविष्यात उद्भवायला नको म्हणून काळजी करत असतात . किव्हा भविष्यकाळात सगळं नीट असेल ना ह्याची चिंता त्यांना असते. पण ते हे विसरतात कि कालच्या भूतकाळामुळे त्यांची आजची रिएलिटी बनली आहे आणि आज चिंता करून आणि तोच तोच विचार करून भविष्यात काय असणार ह्याची तरतूदच ते करत आहेत.

आज तुम्ही काही वेगळं केलंत म्हणजे जे  तुम्हाला भविष्यात  हवं आहे त्यासंदर्भात काही केलात तर ते उद्याला तुमची रिएलिटी बनली असेल.

आपण आकर्षणाचा सिद्धांत कसा वापरायचा हे पाहू या !

असं म्हंटल जात कि दिवसभरात आपण साधारण पणे  ६५००० विचार आपल्या मनात येऊन जातात पण आपण फार थोड्या विचारांवर लक्ष केंद्रित करतो. विचार जेव्हा मनात येतो तेव्हा त्याची कंपन जास्त स्ट्रॉंग नसतात पण तुम्ही जेव्हा त्याच्या कडे लक्ष देता तशी ती स्ट्रॉंग बनतात आणि मग भावना तयार होतात. आणि ह्या  भावनांमुळे च तुम्हाला कधी छान वाटत,कधी दुःख होत.

आकर्षणाच्या सिद्धांताचे तीन टप्पे आहेत.

मागणी करा .

तुमची मागणी पूर्ण होणे

आणि तुमची पूर्ण झालेली मागणी स्वीकारा.

मागणी करा :- तुमच्या मनात एखादी इच्छा तयार होते,ती तुम्ही निसर्गा कडे किव्हा परमेश्वराकडे व्यक्त करता.

परमेश्वर किव्हा निसर्ग तुमची इच्छा पूर्ण करतो.  आणि तिसरी शेवटची अतिशय महत्वाची पायरी कि  तुम्हाला परमेश्वर देत आहे त्याला  स्वीकारण्याची स्वतःला अनुमती देणं.

तिसरा मुद्दा थोडासा नीट समजून घेणं गरजेचं आहे कारण खूप जणांचा असा अनुभव असू शकतो कि आम्ही इच्छा व्यक्त केली ,तरी मिळतेच असं नाही ह्याच कारण असं आहे कि तुम्हाला जी तुमची इच्छा पूर्ण व्हावी असं वाटतं त्या इच्छेचा प्रतिसाद स्विकारण्याच्या मनस्थितीत तुम्ही जर नसाल तर तुमची इच्छा पूर्ण होऊनही तुम्हाला ती पूर्ण झाल्यासारखी वाटणार नाही.

ह्याच कारण असं आहे कि तुमची स्पंदन आणि तुमच्या इच्छेची स्पंदन जुळायला हवीत आणि  त्यासाठी तुमची अनुमती हवी. हे थोडस समजायला कठीण जाऊ शकत जर तुम्ही पहिल्यांदा वाचत असाल तर. आज मी एक वेबिनार अटेंड केलं मास्टर आकर्षण ह्यांचं ,ते ह्याच विषयावर बोलत होते,त्यांनी एक उदाहरण सांगितलं. त्यांचा एक शो आहे “आस्क मास्टर एनी थिंग “! त्यामध्ये  काही लोक रॅन्डमली सिलेक्ट केली जातात प्रश्न विचारण्यासाठी, आणि एक व्यक्ती होती जिची  तीव्र इच्छा होती तिला फॅशन इंडस्ट्री मध्ये काम सुरु करायला कोणी इन्व्हेस्टर हवा होता. आणि त्या व्यक्तीचा नं सिलेक्ट केला गेला आणि मास्टर आकर्षण ह्यांनी त्या व्यक्ती ला फोन लावला आणि सांगितलं कि ह्या शो मध्ये ५००० लोकांमधून तुमचा नं प्रश्न विचारण्यासाठी सिलेक्ट केला गेला आहे तर तुमचा प्रश्न विचारा.

त्या व्यक्तीने सांगितलं कि माझी अशी फॅशन इंडस्ट्री मध्ये काम करायची इच्छा आहे आणि मला इन्व्हेस्टर हवा आहे. मी आकर्षणाच्या नियमाचे सर्व पालन करतो तरी माझी इच्छा पूर्ण होत नाही आहे. मास्टर आकर्षण त्या व्यक्तीला म्हणाले कि मी पण फॅशन इंडस्ट्री मध्ये इन्व्हेस्ट करतो आहे गेल्या काही वर्षांपासून तुझी काय मागणी आहे, त्या व्यक्तीला काहीही सांगता आलं नाही ,त्याच्या कडे काहीही मुद्दे तयार नव्हते.

ह्या उदाहरणाकडे नीट पाहिलं तर लक्षात येईल कि त्याने इच्छा व्यक्त केली,परमेश्वर /निसर्गाने त्याला प्रतिसाद दिला ,पण तो प्रतिसाद स्वीकारायला तयार नव्हता आणि त्यामुळे संधी गमावली.

इथे तुमच्या लक्षात येईल कि तुमची स्पंदन आणि तुमच्या इच्छेची स्पंदन जुळायला लागतात हे किती महत्वाचे आहे. आणि तुम्ही जेव्हा इच्छा व्यक्त करता त्या नंतर तुम्ही स्वतःला कायम  इच्छापूर्ती साठी तयारी ठेवायला हवं.

इच्छापूर्ती साठी स्वतःला कस तयार करायचं हे आपण पुढच्या लेखात पाहू या !

 

 

One comment

  1. Pingback: इच्छापूर्ती साठी स्वतःला कस तयार करायचं? - Rajshree Panse

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *