भगवत गीतेतून शिका सफलतेची सूत्र 
भगवत गीतेतून शिका सफलतेची सूत्र 

भगवत गीतेतून शिका सफलतेची सूत्र 

Reading Time: 3 minutes

बुक रिव्यूभगवत गीतेतून शिका सफलतेची सूत्र 

लेखकडॉ कपिल कक्कड 

लेखक डॉ कपिल कक्कड हे  व्यवसायाने मानसशास्त्रज्ञ आहेत त्याच सोबत कार्पोरेट प्रशिक्षक ,सल्लागार,प्रेरक लेखक आणि अध्यात्मिक गुरु आहेत. त्यांनी माईंड कोच नावाची भावनांना संचालित करणारी एक प्रक्रिया शोधून काढली आहे आणि आध्यत्मिक आणि शास्त्रीय तंत्राच्या माध्यमातून तणाव व्यवस्थपणावर काही प्रोग्राम तयार केले आहेत.

पेजेस  १६०

हे पुस्तक भगवत गीतेतील तत्वज्ञान आणि उपदेशांवर आधारित आहे. ह्यामध्ये तणाव ,आत्मविश्वासाचा अभाव ,चिंता दूर करून जीवनात सुख ,शांतात,समाधान मिळवून मानवी जीवन सफल करण्याविषयी मार्गदर्शन केलेले आहे.

भगवत गीता हा विवेक, बुद्धी आणि प्रतिभेचा संगम असणारा ग्रंथ आहे

भगवत गीतेतील १० व्या अध्यात  भगवान श्रीकृष्ण सांगतात किप्रत्येक  जिवंत व्यक्तीच्या हृदयात वास करणारा महान आत्मा म्हणजे मीच आहे ,मीच सर्व जीवांचा  आदि ,मध्य आणि अंत आहे. “

परमेश्वर आपल्या सर्वांचं आतच दडलेला आहे त्यामुळे सर्व समाधान होण्यासाठी आपण आपल्याआतच डोकावायला हवं

जो पर्यंत तुम्ही परमेश्वर आणि त्याचे नियम समजून घेत नाही तोवर तुम्ही जीवनात यशस्वी हो ,आनंदी होणं शक्य होत नाही. तुम्ही स्वतः आपल्या कर्माने आपले भाग्य निर्माण करत असता. आणि परमेश्वर किव्हा निसर्ग,महाशक्ती तुम्ही जे काही नाव द्याल ते ,ती शक्ती तुम्हाला कर्मा प्रमाणे फळ देत असते. त्यामुळे जीवनात परिपूर्ण सफलता मिळवायची असेल तर निसर्ग नियमनाचे महत्व आणि उपयोगिता समजून घेणे गरजेचे आहे

भगवान श्रीकृष्णाने भगवतगीतेत  स्पष्ट स्वरूपात सांगितले आहे कि तुम्हाला जर जीवनात सफलता हवी असेल तर तुम्हाला सर्वाना निसर्गाने बनवलेल्या नियमानुसार चालावे लागेल

कर्मासोबत आसक्ती ठेवू नका. कर्म आपल्या सोबत आहे पण फळ आपल्या हातात नाही. हेच आपण सक्सेस लॉ 

मध्ये शिकतो ,कर्मसोबत आसक्ती नाही म्हणजेच लॉ ऑफ डिटॅचमेंट. कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात त्याचे विचार आणि कर्म हेच त्याच्या जीवनाचा आधार असतात.

आपली समज आणि चारित्र्य हेच बाह्य जीवनात आपले वागणे आणि आचरण सादर करत असतात. आणि अशा प्रकारे वर्तमान जीवन हे भूतकाळात केलेल्या कर्माची फळ असतात. तुमचं कर्म हे तुमची सफलता,असफलता ,आनंद,दुःख ह्या  सर्वांसाठी साठी जबाबदारअसतं आणि तुमच्या ऊर्जेचा स्त्रोत  हि तुमचं कर्म असत म्हणजेच तुमच्या कडे असणारी सकारात्मक ऊर्जा हे तुमच्या सकरात्मक ,चांगल्या कर्माचे प्रतीक असत आणि नकारात्मक ऊर्जा हि नकारात्मक कार्याचे प्रतीक असत. सकारात्मक दृष्ट्या विचार करत असणारी व्यक्ती नेहमी हाच विचार करत असते ती जे काम करत आहे त्याने समाजाचे ,देशाचे कल्याण होत आहे. आणि तुम्ही जेव्हा असाच विचार करता तेव्हाच तुम्ही यशस्वी बनता अश्या व्यक्तींचा निसर्गाच्या नियमांवर पूर्ण विश्वास असतो. .

ह्या सकरात्मक ऊर्जेच्या प्रवाहात आळस (लेझिनेस ) ,नकारात्मक चिंतन(निगेटिव्ह थॉट्स),हीन भावना(लॅक ऑफ कॉफिडन्स ) ,संकल्पशक्तीचा  अभाव. (गोल सेट नसणं),तणाव (टेन्शन) ह्या सगळ्या गोष्टी अडथळे निर्माण करत असतात. आणि ह्यावर मात करण्यासाठी काही उपाय हि लेखकांनी ह्या पुस्तकात सुचवलेले आहेत. मानवी मेंदू ज्याला आपण मन असं हि म्हणतो हि आपल्याला मिळालेली परमेश्वरीय भेट आहे. मेंदू नियंत्रण म्हणजे मन कसं कंट्रोल करायचं ह्यावर त्यांनी अतिशय सुरेख मार्गदर्शन ह्या पुस्तकामध्यें केलेले आहे. मेडिटेशन ,सकारात्मक विचारांचा सराव  म्हणजेच अफार्मेशन्स ,वर्तमान  काळात जगणे,सात्विक आहार ,नकारात्मक लोकांपासून दूर राहणे ,शिस्त ,विशाल दृष्टीकोन सकारात्मक विचारांवरच कायम फोकस असणे ,आत्म परामर्श म्हणजे तुम्हाला तुमचे चांगलेवाईट गुण  माहिती हवेत. मानसिक चित्रण (विझ्युलायझेशन )हे उपाय सांगितले आहेत. त्याच सोबत परमेश्वरावरचा विश्वास आणि स्वतःवरचा विश्वास हि तेवढाच महत्वाचा आहे.

जीवनात सफलता मिळवण्यासाठी एखादे ध्येय किव्हा उद्देश असणे आवश्यक असते.एखाद्या जीवाचा जन्म आणि अस्तित्व हे सुद्धा निसर्गाने ठरवलेले ध्येयच असते. प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करणे खूप गरजेचे असते. तुमच्या जीवनाचा मुख्य उद्देश ओळखा समाधान,सफलता ,प्रसन्नता ,आणि अध्यात्मिकता ह्यातील सर्व किव्हा ह्यातील एक उद्दिष्ट तुमचे असू शकते. सर्वाना भरभरून प्रेम द्या आणि क्षमा करा हे दोन्ही गुण  तुम्हाला परमेश्वराच्या जवळ नेतात. प्रेम म्हणजे फक्त नाते संबन्ध किव्हा स्त्रीपुरुष प्रेम नव्हे तर सर्वाना एकाच पातळीवर समजून भेद भाव करत केलेलं प्रेम ,कारण आपल्या सर्वानाच माहित आहे परमेश्वर सगळ्यांच्या हृदयात असतो. स्वतःला ,आजूबाजूच्या लोकांना क्षमा करायला शिका त्यामुळे तुमची नकारात्मक भावनांपासून सुटका होते.

अतिशय सुंदर पुस्तक आहे आणि माझी सर्वाना विनंती आहे कि तुम्ही हे पुस्तक जरुर वाचा,ऍमेझॉन वर हे उपलब्ध आहे.

यशस्वी होण्याचे ७ स्पिरिच्युअल नियम आहेत,अधिक माहिती घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *